ऑनलाइन मार्केटिंग मध्ये अधिकचा नफा मिळवण्यासाठी दिलेल्या framework चा नक्की उपयोग करा

21 व्या डिजिटल युगात व्यवसायात चांगले यश मिळवायचे असेल तर नवीन गोष्टी शिकत राहाव्याच लागतील. 

Mon Jul 25, 2022

AIDA FRAMEWORK

आज जेंव्हा मी आपल्या मराठी व्यवस्याईक मित्रांना ऑनलाईन विक्री करता वेळेस बघतो तेंव्हा मला त्यांच्या जिद्दी चे कोतुक वाटते, वेग वेगळे व्हॉट्सॲप ग्रुप मध्ये ते जॉईन असतात, बऱ्या पैकी फेसबुक ग्रुप ला जॉईन असतात, आपला प्रॉडक्ट किंवा सेवा यांचे प्रमोशन करण्याचा पुरेपूर प्रयत्न ते करतात.

पण....


ऑनलाईन मार्केटिंग करता वेळेस तुम्हाला काही बेसिक गोष्टी माहिती असायला हव्यात त्याबद्दल आज आपण बोलणार आहोत.


एक एक पायरीने शिकूया, आपण ग्राहकाला प्रॉडक्ट किंवा सेवा विकतो पण मार्केटिंग म्हटले की आपल्याला डायरेक्ट विक्री हेच आठवते पण हे चुकीचे आहे, त्यासाठी तुम्हाला ग्राहकाचे ३ प्रकार समजले पाहिजे.

मार्केटिंग करता वेळेस ग्राहकाचे ३ प्रकार समजून घ्या.

१. Cold audience : हे म्हणजे ज्यांनी तुमची जाहिरात पहिल्या वेळेस पाहिली, पूर्वी ते तुम्हाला ओळखत नव्हते.


२.Warm audience : हे म्हणजे ज्यांनी तुमची ad २ ते ३ वेळेस पूर्वी पाहिली आणि थोडक्यात ते तुम्हाला ओळखतात पण जास्त ओळखत नाहीत.

३.hot audience : हे म्हणजे ज्यांची तुम्हाला लीड मिळाली आहे, त्यांना तुमच्या ब्रँड बदल बऱ्या पैकी आयडिया आहे.


आता व्यावस्याईक सर्वात गंभीर चूक करतात ते म्हणजे ते cold audience ला विकायचा प्रयत्न करतात, पण एक लक्षात असू द्या मार्केटिंग च्या अनेक पुस्तकात लिहून ठेवले आहे cold audience कधीही विकत घेत नाही किंवा विकत घेण्याचे chances कमी असतात.

तर मग काय करायचे ?


मित्रानो, कायम एक लक्षात ठेवा मार्केटिंग चा उद्देश cold audience चे warm audience मध्ये रुपांतर करणे व warm audience चे hot audience मध्ये रुपांतर करणे हे असायला पाहिजे तरच त्याला खरी मार्केटिंग केली असे आपण बोलू.


आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हे कसे करायचे तर थोडक्यात तुम्हाला एक फ्रेमवर्क सांगणार आहे ते लक्षात ठेवा.


AIDA FRAMEWORK

A Attention / awareness.
I interest.
D Desire.
A Action.


आता समजून घेऊ.

जाहिरात करता वेळेस तुम्हाला खालील squenece पाळायचा आहे.


१. Attention/Awareness : सुरवातीला लोकामध्ये तुमच्या प्रॉडक्ट किंवा सेवे बदल जागरूकता तयार करा, वेग वेगळ्या ad द्वारे तयार करता येते, ते आपण भविष्यात बघणार आहोत.


२.Interest : एकदा का लोकामध्ये तुमच्या बदल awareness झाला की मग लोकांचा इंटरेस्ट तयार होईल या गोष्टी त्यांना दाखवायच्या जसे की तुमचे रिझल्ट, तुमच्या सक्सेस स्टोरी आणि अनेक प्रकारे करता येते.

३.Desire : आता २ गोष्टी वरती आपण काम केले, आता तुम्हाला ग्राहकाची desire तयार करायची आहे ती तुम्ही वेग वेगळ्या ऑफर देऊन वाढवू शकता.

४. आणि सर्वात शेवटी येते ती म्हणजे अँक्शन अर्थात कृती, इथे लोकांना तुम्ही बिनधास्त विकत घ्या म्हणू शकता 😅आणि लोक घेतील पण.



तर मित्रांनो, अश्या प्रकारे तुम्ही व्यवस्थित मार्केटिंग केल्यास तुम्हाला नक्कीच फायदा होईल यात काही शंका नाही, आपली वेबसाईट नवीन आहे, सध्या या वरती काम सुरू आहे,नवीन ब्लॉग येताच राहतील, त्यामुळे newsletter ला सबस्क्राईब नक्की करा

dhananjay kalyankar
मराठी व्यवसायिक मित्रांना मार्केटिंग शिकवण्याचा ध्यास घेतलेला एक तरुण  😊✌️

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
10x Biz Funnel 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy